संगमनेर (नितीन भालेराव):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पद्दस्पर्शाने पवित्र भूमीत,संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवास २३ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त भव्य स्वरुपाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त राज्यस्तरीय अश्व प्रदर्शनात अश्वाची खरेदी-विक्री होणार.तसेच कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम,कै.पांडुरंग मुळे(मांजरवाडीकर) तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशाच्या कार्यक्रम,जंगी कुस्त्यांचा हगामा इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा व ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.हिवरगाव पावसा येथे माघ पोर्णिमा यात्रा उत्सवास २३ फेब्रुवारी रात्री ८ वाजता काठी पालखी (छबिना) मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ वाजता ग्रामदैवताची पूजा,काठी पालखी मिरवणूक हिवरगाव पावसा ते श्री क्षेत्र खंडोबा मंदिरापर्यंत देवाची मिरवणूक.मान्यवर पाहुण्याच्या हस्ते महापूजा श्रींचे मंगल स्नान नंतर महाआरती संपन्न होईल.अश्व मिरवणुकीने अश्व प्रदर्शनास सुरुवात होणार आहे.
सदर अश्व प्रदर्शनात राज्यभरातून अश्व दाखल होणार आहेत.या राज्यस्तरीय अश्व प्रदर्शनात अश्वाची खरेदी-विक्री होणार,अश्व प्रदर्शना बरोबर इतर पाळीव प्राण्याची खरेदी-विक्री होते. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ते १२ वाजता महाराष्ट्राच्या महागायिका कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ते ११ वाजता स्थानिक वाघ्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.२५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजता जंगी कुस्त्यांचा हगामा होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता कै.पांडुरंग मुळे(मांजरवाडीकर) तमाशा नाट्यमंडळाचा मोफत तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ते १२ वाजता कै.पांडुरंग मुळे(मांजरवाडीकर) तमाशा नाट्यमंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. माघ पोर्णिमा यात्रा उत्सवा निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांला उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, सरपंच सुभाष गडाख,यात्रा कमिटी अध्यक्ष मच्छिंद्र गडाख,ग्रामपंचायत हिवरगाव पावसा व ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.