अहमदनगर (दि.२१ फेब्रुवारी):-गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणा-या इसमांवर कोतवाली पोलीसांनी कारवाई ५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई ता.१९ फेब्रुवारी रोजी जुन्या कलेक्टर ऑफिस जवळ पराग बिल्डिंगच्या शेजारील रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास कोतोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने केली आहे.या कारवाईत ५ लाख रुपयांची एक मालवाहू महिंद्रा पिकअप व ६५ हजार रुपयांचे गोवंशीय जातीची पांढरे व काळ्या रंगाचे ठिपके असलेले तीन मोठे व दोन छोटी अशी एकूण पाच जनावरे ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी अरबाज गफ्फुर शेख,कल्लू उर्फ सोफियान कुरेशी यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम सन १९९५ चे कलम ५(अ) ९ प्राण्यांना कृडतेने वागवण्यास प्रतिबंध करणे बाबतचा अधिनियम १९६० चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ/संतोष बनकर हे करीत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/शाहीद शेख,मपोना/संगीता बडे, पोकॉ/दिपक रोहोकले,पोकॉ/ सत्यजित शिंदे,पोकॉ/तानाजी पवार,पोकॉ/सुरज कदम, पोकॉ/सोमनाथ केकान, पोकॉ/शिवाजी मोरे,पोकॉ/ महेश पवार,पोकॉ/अभय कदम,पोकॉ/अमोल गाडे यांनी केली आहे.