राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतीच राष्ट्रवादीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या हस्ते साळवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवाजी साळवे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. कामगार क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरु आहे.इंडियन सिमलेस कंपनीमध्ये युनियनचे अध्यक्ष व सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. सामाजिक विषयांवर त्यांनी आंदोलन करुन व पाठपुरावा करुन सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
चर्मकार समाजात देखील त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे. गटई कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करुन महापालिका हद्दीत त्यांना पीचपरवाने मिळवून दिले. चर्मकार संघर्ष समितीची स्थापना करुन समाजातील प्रश्न सोडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. वधू-वर परिचय मेळावे, समाजाला संघटित करण्यासाठी मेळावे व महापुरुषांची जयंती उत्सव ते साजरी करुन मोठा वर्ग त्यांनी आपल्या जनसंपर्काने जोडला आहे. पूर्वीपासूनच ते राष्ट्रवादी पक्षाशी जोडले गेलेले असून, त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाला बळकट करण्यासाठी व पक्षाच्या ध्येय-धोरणाने काम केले जाणार आहे. राज्यातील कल्याणकारी योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी कार्य करणार असल्याची भावना शिवाजी साळवे यांनी व्यक्त केली.