
अहमदनगर (दि.२० फेब्रुवारी):-क्लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख एक लाखांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नवनागापूर मधील आनंदनगर येथे घडली आहे.
याबाबत आयुब अकबर इनामदार रा.नवनागापूर आनंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादविक ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.एमआयडीसी हद्दीमध्ये चोरांचा सुळसुळाट सुटला आहे.यात चोरट्यांना रोखण्यात एमआयडीसी पोलीस अपयशी ठरले आहेत.
एमआयडीसी हद्दीमध्ये कंपन्या असल्यामुळे येथे चोरट्यांचा वावर जास्त प्रमाणात असून चोऱ्यांचे प्रमाणात अधिक आहे.नव्यानेच बदलून आलेले सपोनि/माणिक चौधरी यांच्यापुढे चोरट्यांचे एक प्रकारे आव्हानच निर्माण झाले आहे.दररोज होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले असून रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी अशी नागरिकांमधून दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे.