Maharashtra247

अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा हॉटेल व्यवसायाकरीता वापर करणारा आरोपी १० गॅस टाक्यांसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

नगर प्रतिनिधी (दि.३१.डिसेंबर):-अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा हॉटेल व्यवसायाकरीता वापर करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.अनिल कटके यांना जिल्हयातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्येशाने अवैध धंद्याची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके,परि. पोउपनि प्रदिप बोऱ्हाडे, परि.म.पोउपनि ज्योती डोके, परि.म.पोउपनि शितल मुगडे, परि.म.पोउपनि फराहनाज पटेल,पोहेकॉ/संदीप पवार, पोहेकॉ/संदीप घोडके,पोना/ शंकर चौधरी,लक्ष्मण खोकले, पोकॉ/कमलेश पाथरुट, योगेश सातपुते,चपोहेकॉ / चंदु कुसळकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर असे अहमदनगर शहरात पेट्रोलिंग करत असतांना श्री.अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरामध्ये कोठला चौक येथे हॉटेल कुरेशी मध्ये घरगुती वापराकरीता असलेला गॅस सिलेंडरचा काळया बाजारातून खरेदी करुन अवैधरित्या साठा करुन ठेवला असून तो घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस हॉटेल व्यावसायासाठी वापर करीत आहेत.अशी बातमी मिळाल्याने श्रीमती एन.एम. पाईकराव,पुरवठा निरीक्षक,अन्नधान्य वितरण अधिकारी,कार्यालय,यांना बोलावून कारवाई करणेकामी सोबत घेतले.त्यानंतर सदर पथकाने अहमदनगर शहरातील कोठला चौक येथे हॉटेल कुरेशीमध्ये घरगुती गॅस टाक्यांचा वापर हॉटेल व्यवसायाकरीता होत असलेबाबत खात्री झाल्याने सदर ठिकाणी छापा टाकून २९,२६०/- रु. किमतीच्या एकुण १० घरगुती वापराच्या गॅस टाक्या मिळुन आल्याने त्या ताब्यात घेऊन तेथे काऊंटरवर हजर असलेला इसम नामे (१) सिकंदर कलीम सय्यद (वय २९ रा. गाडळकर मळा,गाजीनगर, अहमदनगर) यास ताब्यात घेऊन त्यास हॉटेल मालकाबाबत विचारले असता त्याने त्याचे नाव २) समीर बाबुलाल कुरेशी रा.व्यापारी मोहला,नालबंद खुंट,अहमदनगर असे असलेचे व सदर गॅस टाक्यांचा वापर मी त्यांचे सांगणेवरुन करीत आहे असे सांगितले.सदर ठिकाणी मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या व (१) सिकंदर कलीम सय्यद वय २९ रा.गाडळकर मळा,गाजीनगर, अहमदनगर यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले.त्यांचे विरुध्द तोफखाना पो.स्टे.गुरनं १२०७/२०२२ भादवि कलम १८८,सह जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३,७ सह एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई डॉ.श्री. बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

You cannot copy content of this page