श्रीरामपूर (ॲड.प्रशांत राशिनकर):-अहमदनगर जिल्हापरिषद शिक्षण विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन घाडगे पाटील विद्यालय नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आले होते.यामध्ये गोळाफेक व कबड्डी या स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा नायगाव नवे शाळेने श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत नायगाव नवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे.मोठा गट मुले गोळाफेक स्पर्धेत शाळेचा जिद्दी विद्यार्थी चि.अविनाश अशोक वाघ (इ.७ वी) या विद्यार्थ्याने अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.अविनाशच्या लक्षवेधी व दमदार गोळाफेकीची जिल्हाभर चर्चा झाली.तर मोठा गट मुले कबड्डी स्पर्धेत नायगाव नवे शाळेतील विद्यार्थी प्रज्वल दातीर,आदित्य बुचुडे,कृष्णा लांडे,अविनाश वाघ,यशवंत राशिनकर,गोकुळ गायकवाड,सार्थक लांडे,सुजित दातीर,साई राशिनकर,वेदांत राहिंज,श्रुतिक आदमाने,राहुल बर्डे या विद्यार्थ्यांच्या कबड्डी संघाने सेमी फायनल मॅच मध्ये चुरशीची लढत देऊन जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले.
या विद्यार्थ्यांना नायगाव नवे शाळेचे मुख्याध्यापक श्री.रंगनाथ देसाई,मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सोमनाथ शेंडे,भगवान काशीद,विजय तरस,कुमार शेवाळे,फ्रान्सिस हिवाळे व जयश्री कुमावत,नायगाव जुने शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, तालुका क्रीडा प्रशिक्षक अजित कदम,बाळासाहेब शेळके यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच उमेश राशिनकर व शशिकांत राशिनकर यांची विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने आण करण्यासाठी गाडी वाहतुकीची खूप मदत झाली.या सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल मा.दीपक अण्णा पटारे पा. (भाजपा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष) जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कलगुंडे,केंद्रप्रमुख राजू इनामदार,,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता साठे,उपाध्यक्षा नलिनीताई लांडे, श्री सुभाष लांडे पा. श्री बाळकृष्ण भोसले पा. श्री. बी के पा. विद्यमान संचालक श्री बाबासाहेब राशिनकर श्री अरुण राशिनकर श्री. उत्तम राशिनकर श्री रोहित लांडे श्री अरुण भारसकल श्री सुनील दातिर श्री प्रमोद लांडे पा. श्री रघुनाथ लांडे पा. श्री. निलेश लांडे ॲड.प्रशांत राशिनकर व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत नायगांव सदस्य जनसेवा मंडळ नायगांव व पालक यांनी अभिनंदन कौतुक केले आहे.