दादासाहेब रुपवते यांच्या जयंती निमित्त धम्मयात्रा उत्साहात संपन्न
संगमनेर (नितीन भालेराव):-भंडारदरा येथे दादासाहेब रुपवते यांच्या जयंती निमित्त धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळेस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना समता भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच माधवराव लंकेश्वर,कवी किरण सोनावणे,के.बी.मोटघरे,शरद तपासे यांना जीवन गौवरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कायदेतज्ञ संघराज रुपवते,राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते,मिलिंद सोनावणे, विनोद गायकवाड,भदंत नागघोष,प्रकाशराव लहितकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
सकाळी १०वा.पंचशिल ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.दिवंगत माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांना पुष्पांजली अर्पण केली.यावेळी रुपवते परिवारातील सर्व सदस्य,उपस्थितीत मान्यवर,धम्म यात्रा कमिटीच्या वतीने आदरांजली वाहिली.भदंत नागघोष व त्यांच्या संघाने त्रिशरण पंचशील दिले.प्रकाश डोळस याच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी डॉ.सुधाकर शिंदे,पत्रकार दिनकर बर्वे,सुरेश जगधने,शैला भालेराव,आदींनी धम्म व राजकारणा विषयी आपले विचार प्रकट केले.पोपटराव सोनावणे यांनी जाती-जमाती धम्म व राजकारणा विषयी विचार मांडले.
भोजनदानानंतर बैलगाडीतून म.फुले,छ.शाहूमहाराज, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांची वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी बहुजन शिक्षण संघातील विद्यार्थी व शिक्षकांनी सुंदर असे लेझीमनृत्य सदर उपस्थितीतांची माने माने जिंकली.दुपारच्या सत्रात माधवराव लंकेश्वर,कवी किरण सोनावणे,के.बी.मोटघरे,शरद तपासे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कवी किरण सोनावणे यांनी मा.आ.दादासाहेब रुपवते यांच्या वर काव्य सदर केले.शाहीर संदेश ऊमाप यांनी विद्रोही गीतांनी प्रबोधन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कायदेतज्ञ संघराज रुपवते यांनी दिवंगत दादासाहेब रुपवते यांच्या सामाजिक बांधिलकीला उजाळा दिला.आणि पुढील वर्षी १०० व्या जयंती शाताब्धी निमित्त भव्य स्वरूपाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी धम्म यात्रा कमिटी,बहुजन शिक्षण संघ,दादासाहेब रुपवते फौंडेशन,विश्व भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमीसमिती कोतूळ,आरपीआय पक्षाचे नेते,कार्यकर्ते,जिल्ह्या बाहेरून आलेले मान्यवर पत्रकार, शिक्षक,विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.