अहमदनगर (दि.२ मार्च):-
▶️युनिट-अहमदनगर.
▶️तक्रारदार-पुरुष,वय-45
आलोसे-1)सुनील मारुती शेळके,वय-45 वर्ष, पद-प्रधान तंत्रज्ञ,वर्ग-3 बेलवंडी सेक्शन,बेलवंडी,ता.श्रीगोंदा,जि. अहमदनगर,रा.थोरात वस्ती,वाडेगव्हाण,ता.पारनेर,जि. अहमदनगर
2) वैभव लहु वाळके,वय-22 वर्षे,बाह्यस्रोत तंत्रज्ञ,बेलवंडी सेक्शन अंतर्गत लोणी गाव ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर,रा.बेलवंडी
▶️ *लाचेची मागणी-1500/- रुपये दिनांक-01/03/2024 रोजी
▶️ *लाच स्विकारली-*
1500/ रुपये-दिनांक-01/03/2024 रोजी
▶️ हस्तगत रक्कम-1500/-रुपये
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांच्या शेतातील विद्युत रोहित्र(DP) जळीत झाले होते,ते त्यांनी दुरुस्त करून पुन्हा बसविण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करणे आवश्यक होते,सदर विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी यातील आलोसे क्र.2 वाळके हे आलोसे क्र.1 शेळके यांच्या करिता व स्वतः करिता 1500/-रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार लाप्रवि अहमदनगर कडे दिनांक 29/02/2024 रोजी प्राप्त झाली होती.
त्यानुसार दिनांक 01/03/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,पडताळणी दरम्यान आलोसे क्र.1 सुनील शेळके व व आलोसे क्र.2 वैभव वाळके यानी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 1500/-रुपये लाच मागणी करून आलोसे क्र.1 यांनी सदर लाच रक्कम आलोसे क्र.2 वैभव वाळके यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले,त्यानुसार दिनांक 01/03/2024 रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र.2 वैभव वाळके यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 1500/- रुपये लाच रक्कम स्वीकारली त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे,तसेच आलोसे क्र.1 सुनील शेळके यांना ताब्यात घेण्यात आले आहे.