Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे पाच बूथवर होणार पोलिओ लसीकरण;प्रवाशी बालकांच्या लसीकरणासाठी टोल प्लाझा येथे दोन बूथ 

संगमनेर (नितीन भालेराव):-राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत हिवरगाव पावसा परिसरात रविवारी (ता.३) मार्पच रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत गावातील पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस पाजले जाणार आहेत.तसेच नाशिक पुणे महामार्गावर प्रवास करणारे बालके लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी टोल प्लाझा येथे दोन बूथ लावून बलकांचे लसीकरण केले जाणार आहेत.हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

या पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे एक बूथ,उंबरवाडी अंगणवाडी येथे एक बूथ,अरखाडी अंगणवाडी येथे एक बूथ,हिवरगाव टोल प्लाझा येथे दोन बूथ असे एकूण पाच बूथ वर हिवरगाव पावसा येथे पोलिओ डोस दिला जाणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविली जाते.पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही मोहीम राबविली जाईल. या मोहिमेत जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील, त्यांना ५ ते ७ मार्च दरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीमद्वारे डोस दिला जाईल.

पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील बूथवर आरोग्यसेविका नेहे एन.पी.,अंगणवाडी सेविका रंजना पावसे,अशासेविका अलका पावसे,उंबरवाडी अंगणवाडी येथील बूथवर अंगणवाडी सेविका दिपाली वाकचौरे, मदतनीस सुजाता पावसे,अरखडी अंगणवाडी येथील बूथवर अंगणवाडी सेविका सोनाली पावसे,मदतनीस माधुरी भालेराव,हिवरगाव पावसा टोल प्लाझा येथील एका बूथवर आरोग्यसेविका दिपाली मुन्तोडे,यमुना पावसे तर दुसऱ्या बुथवर सीताबाई भालेराव,अशासेविका संगीता पावसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अशी माहिती हिवरगाव पावसा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रचे डॉ.पवनकुमार गायकवाड यांनी दिली. तसेच पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ लसीकरण न विसरता करावे.त्यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये हिवरगाव पावसा गावातील पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page