अहमदनगर (दि.२ मार्च):-एमआयडीसी परिसरात आरडाओरड करुन हातात कोयता घेवुन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.हे घटना १ मार्च रोजी नगर मनमाड रोडवर घडली आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर मनमाड रोडवर दोन इसम हातात धारदार कोयता घेऊन मोठ मोठयाने आरडा ओरड करून दहशत निर्माण करत आहेत.
सपोनि/चौधरी यांनी पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचे एक पथक तयार करून त्या ठिकाणी जावुन कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेण्यास सांगितले.पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी पोलिसांना दोन जण हातात कोयता घेऊन आरडा ओरड करताना दिसले पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले असता त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता करण सुंदर शिदे रा. शिवाजी नगर एमआयडीसी,विशाल दिपक कापरे रा.चेतना कॉलनी नवनागापुर ता.जि अहमदनगर) असे सांगितले.
त्यांचे कडुन एक लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरूध्द पोकॉ/सचिन नागरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता गुरनं २१९ / २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३), ११०/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे दोन्ही तरुण सराईत असुन त्यांचे वर पोलीस स्टेशन मध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खेरे अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई/मनोज मोंढे,पोहकॉ/नंदकिशोर सांगळे,/पोहेकॉ/गणेश चौधरी,पोहेकॉ/राजेंद्र सुद्रिक, पोहेकॉ/सुनिल आव्हाड,पोना/महेश बोरूडे, पोना/विष्णु भागवत,पोकॉ/ किशोर जाधव,पोकॉ/ दहिफळे,पोकॉ/उमेश शेरकर, पोकॉ/सचिन नागरे,मोबाईल सेल दक्षिण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल/राहुल गुंडू यांनी केली आहे.