Maharashtra247

देऊळगाव राजा विधानसभा सिंदखेड राजा येथे बहुजन चेतना शिबीर उत्साहात संपन्न

बुलढाणा (प्रतिनिधी):-देऊळगाव राजा विधानसभा सिंदखेडराजा मतदारसंघ येथे बहुजन चेतना शिबिर उत्साहाने संपन्न झाले.या कार्यक्रमात ईंजी अनिरुद्ध रणवीर,व प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांनी दोन सत्रात मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्रात ईंजी अनिरुद्ध म्हणाले की,बहुजन समाजातील नवतरुणांनी कांशीरामजी यांची मुहमेंट समजुन घेऊन राजकारणात प्रवेश करावा.फुले,शाहु आंबेडकर यांनी सांगीतल्याप्रमाणे शासनकर्ती जमात बनण्यासाठी समाजाला प्रशिक्षित करावे असे प्रतिपादन दे.राजा येथील केडर कॅम्प मध्ये रणवीर यांनी केले.बहुजन महापुरुषांचा जिवन संघर्षाचे उदा.देऊन समाजाने तयार व्हावे व कांशीरामजींची चळवळ चालवावी,दुस-या सत्रात मार्गदर्शन करतांना प्रभात खिल्लारे यांनी बाबासाहेबांची चळवळ देश पातळीवर कांशीरामजी यांनी गतीमान केली व भारतभर फिरुन फुले,शाहु,आंबेडकर यांचे संघर्ष,कार्य जनतेला सांगीतले.

शासनकर्ती जमात बनण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार मांडले त्यावर कांशीरामजी यांनी आयुष्यभर काम केले.बहुजन समाजाला एक राष्ट्रीय पार्टी देऊन संविधानाची अंमलबजावणी कशी करतात ते बहेन मायावतीजीं यांना मुख्यमंत्री बनवुन दाखवुन दिले.त्यामुळे बिजेपी व कांग्रेस यांना सोडुन बहुजनांची तिसरी शक्ती मजबुत करावी असे आवाहन प्रभात खिल्लारे यांनी केले.या शिबीरामध्ये प्रामुख्याने बसपाच्या महिला आघाडी बुलडाणा जिल्हाअध्यक्षा संघमित्राताई कस्तुरे,विठ्ठलजी टेकाळे सर,प्रा.निवृत्ती बन्सोडे सर,प्रा.सारीका गवई,अशोक खरात सर,जिल्हा कोषाध्यक्ष रामदासजी मोरे सर , सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष हिम्मतराव जाधव,राहुल इंगळे,नंदु सोसेल सर,विधानसभा अध्यक्षा गंगासागरताई झिने,अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन ल संघपालजी भारती (सरकटे) यांनी केले.यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते,समर्थक,व महिलांनी यात सहभाग नोंदविला.

You cannot copy content of this page