अहमदनगर (दि.१० मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव तालुक्यात खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे व त्याचे दोन साथीदार यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.बातमीची हकीगत अशी की,दि. 03 मार्च रोजी यातील फिर्यादी श्री.राजेश गणेश राठोड (रा.बजरंग नगर, पो.बान्सी,ता.पुसद,जि. यवतमाळ) तसेच त्याचे इतर 04 साथीदार यांनी मागील भांडणाचे कारणावरुन पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे (रा. आंतरवली,ता.शेवगांव) याचे पिस्टल मधुन फायर केला परंतु त्यास गोळी लागली नाही.
त्यावेळी पिन्या कापसे याने त्याचे 7 ते 8 साथीदारांसह फिर्यादी व साक्षीदार यांचा स्कॉर्पीओ गाडीने पाठलाग करुन त्यांना लाकडी लांडके,लोखंडी रॉड,दगडाने मारहाण केली होती. सदर गुन्ह्यामध्ये जखमी नामे अर्जुन पवार हा औषधोपचारा दरम्यान मयत झालेला होता. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302,307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना देवुन रवाना केले. पोलीस पथक शेवगांव या ठिकाणी जावुन आरोपीची माहिती काढत असतांना पोनि.श्री.दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे दोन्ही रा.शेवगांव हे शेवगांव या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर प्राप्त माहिती पथकास कळवुन आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्याने पथकाने शेवगांव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असतांना दोन इसम शिवाजी चौक,शेवगांव येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
त्यांचे कडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302, 307 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहेत. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे,फुरकान शेख, संतोष खैरे,शिवाजी ढाकणे, जालींदर माने,चापोकॉ/अरुण मोरे यांनी केली आहे.