
अहमदनगर (दि.१० मार्च):-अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरामध्ये मार्केटयार्ड पोलीस चौकीच्या परिसरात एका ६२ वर्षीय वृद्धाचा खून करण्याची घटना समोर आली आहे.बाळू विठोबा नागपुरे असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
आज रविवारी दि.१० मार्च दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.घटना घडल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली तर काही संशयित व्यक्तींना देखील कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी ही घटना कशामुळे झाली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही,पोलिसांच्या वतीने या घटनेचा शोध सुरू आहे घटनेमध्ये एक वृद्ध महिला देखील जखमी झाली आहे.