
अहमदनगर (दि.१० मार्च):-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत आलमगीर भागात एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करत आहे.अशी गोपनीय माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सपोनी/राजगुरू यांनी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले.
तपास पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक तरुण त्या ठिकाणी संशयितरित्या फिरत असताना त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली त्याच्या कमरेला असलेला धारदार कोयता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहरुख मेहमूद बेलदार (रा.अमिना नगर ब्रह्मतळे रोड आलमगीर) असे सांगितले.सदरील तरुणा विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरन २२४/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई १० मार्च रोजी करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शाना खाली सपोनी/योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई/महाजन,सफो/सोनार,पोहेकॉ/दिपक शिंदे,पोहेकॉ/संदिप घोडके,पोकॉ/समीर शेख,पोकॉ/ अमोल आव्हाड यांनी केली आहे.