
अहमदनगर (दि.१० मार्च):-श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन या दिवशीच संपूर्ण देशात जागतिक महिला दिन साजरा होत असताना या दोघा आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन नऊ वर्षाच्या मुली वरती दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे यांनी अल्पवयीन मुली सोबत एक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला असून त्याचे मोबाईल चित्रीकरण केल्यानंतर मोबाईल मधील चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत या दोघांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर दिली.
मात्र प्रकरण चांगलेच अंगाशी येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेल्या सगळा प्रकार सांगितला यावरून मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून संतोष रामभाऊ पवार, युवराज नंदू शेंडगे यांच्यावर पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री.विवेकानंद वाखारे हे करत आहेत.