खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षापासुन फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
नगर प्रतिनिधी (दि.१.नोव्हेंबर):-खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्यातील मागिल 10 वर्षापासुन फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री.अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुरेश माळी, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, पोकॉ/सागर ससाणे व रोहित येमुल अशा पोलीस अंमलदार यांना पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश देवुन पथकास लागलीच रवाना केले.पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत फिरुन फरार व पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती घेत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे सचिन बर्डे हा फरार असुन तो कौंडगांव आठरे, ता.पाथर्डी येथे त्याचे राहते घरी आला आहे आत गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी कौडगाव आठरे, ता. पाथर्डी येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवुन सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णनाप्रमाणे एक संशयीत इसम पायी येतांना दिसला पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगितली व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन संभाजी बर्डे वय 30, रा. कौंडगाव आठरे, ता. पाथर्डी असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 184/2012 भादविक 307, 143, 147 प्रमाणे दाखल खुनाचा प्रयत्न गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे,अपर पोलीस अधिक्षक,अहमदनगर व श्री.संदीप मिटके,उविपोअ श्रीरामपूर विभाग अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.