Maharashtra247

वाळूतस्करांच्या दोन गटांत तुफान राडा

अकोले प्रतिनिधी (दि.१.डिसेंबर):-अवैध वाळू व्यावसायिकांच्या अंतर्गत वादातून झालेल्या तुफान हाणामारीत परस्परविरोधी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.एकूण 15 जणांवर गुन्हे दाखले झाल्याने तालुक्यातील वाळू व्यावसायिकांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.वाळूतस्करांच्या दोन गटांत मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी तुफान राडा झाला.यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.ही घटना तालुक्यातील ढोकरी फाटा येथे घडली आहे.सुहास पुंडे यांचे फिर्यादीवरून ऋषिकेश उत्तम देशमुख (रा. सुगाव बु.,ता.अकोले), सचिन किसन सदगीर (रा. पिंपळगाव नाकविंदा), अनिल बाळासाहेब पवार (रा. सुगाव खु), सागर देशमुख (रा. इंदोरी), राहुल जाधव (रा. चितळवेढे), जगन वसंत देशमुख (रा. इंदोरी), जावेद जहागिरदार (रा. अकोले), अजित येवले (रा. मेहेंदुरी फाटा) व रवी आहेर (रा. पिंपळगाव कोंझीरे, ता. संगमनेर) हे नऊजण आणि आणखी सहाजण अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास स.पो.नि.मिथुन घुगे हे करित आहे.

You cannot copy content of this page