सावेडीतील स्मशानभूमीच्या ठरावाला महापौरच जबाबदार भाजप नगरसेवक महेंद्र गंधे
नगर प्रतिनिधी (दि.1.डिसेंबर):-सावेडीतील प्रस्तावित स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा खरेदीचा ३२ कोटी रूपये खर्चाचा ठराव किंवा या व्यवहाराशी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही.किंबहुना पक्षाचा या दोन्ही गोष्टीला विरोधच आहे,असा स्पष्ट निर्वाळा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी केला.हा ठराव किंवा व्यवहाराला पीठासीन अधिकारी या नात्याने सर्वस्वी महापौरच जबाबदार आहेत, असा दावाही गंधे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव किंवा विषयाला व्यक्तिशःमी व भाजपच्या नगरसेवकांनी कोणत्याही स्वरूपात पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचे समर्थनही केले नाही.उलट या एकूणच विषयाला पक्ष म्हणून भाजप व पक्षाच्या नगरसेवकांचाही विरोधच केला आहे.हे असतानाही शहरात विनाकारण पक्षाची बदनामी केली जात आहे.ती खपवून घेतली जाणार नाही असे नगरसेवक भैया गंधे म्हणाले.