परीक्षा केंद्रात बळजबरी घुसून गेटचे कुलूप तोडून शिक्षकांना दमदाटी करणारे तिघे जेरबंद उर्वरित आरोपींचा शोध सुरू शेवगाव पोलिसांची कामगिरी
शेवगाव (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील भगवानबाबा विद्यालय बालमटाकळी परिक्षा केंद्रावर धुडगुस घालणा-या आरोपींना शेवगाव पोलिसांनी अतिशय सिताफिने अटक केली आहे.भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव या ठिकाणी दि.२६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास भुगोल या विषयाचा इयत्ता १० वीचा पेपर होता.
शाळेच्या गेटला कुलुप लावलेले असतांना देखील कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन १५ ते १८ इसम यांनी परिक्षा केंद्रात शिक्षकांना व शिक्षिकेंना त्रास होवुन धाक निर्माण होईल असे वर्तन व कृती करुन हातातील लाकडी काठ्याचा धाक दाखवुन धक्काबुक्की करुन धमकी दिली.व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन परीक्षा केंद्र संचालक यांचे तक्रारीवरुन शेवगाव पोस्टेला गु.र.नं.262/2024 भादवि कलम -353,452,332, 143,146,147,148,149, 504,506 प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर जनार्धन रक्टे रा.मुंगी,दिपक अंकुश सपकाळ रा.बालमटाकळी,अभिषेक भगवान गरड रा.बालमटाकळी ता.शेवगाव जि.अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शेाध घेवुन अटक केली.
उर्वरित आरोपींचा शेवगाव पोलीस शोध घेत आहे.हि कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री.दिगंबर भदाणे, सपोनि/महेश माळी,पोहेकॉ/ परशुराम नाकाडे,पोहेकाँ/ सुधाकर दराडे,पोना/उमेश गायकवाड,पोकॉ/शाम गुंजाळ,पोकॉ/बाप्पासाहेब धाकतोडे,पोकॉ/संतोष वाघ, पोकॉ/कृष्णा मोरे यांनी केली असुन पुढील तपास सपोनि/ महेश माळी हे करत आहेत.