Maharashtra247

वैदू समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मढी येथे ३१ मार्च रोजी भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन देशभरातील समाजबांधव राहणार उपस्थित

अहमदनगर (अहिल्यानगर):-वैदू समाजाच्या वतीने आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रविवार ३१ मार्च रोजी परिवर्तन मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यास महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा,गुजरात,मध्यप्रदेश या ठिकाणा वरुन वैदू बांधव उपस्थित राहून संघटीत होणार आहेत.संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्य आणि केंद्राने वैदू समाजाच्या विशेष मागण्याच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा व तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते व समाजबांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे.

मढी नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वैदु समाज पोटासाठी भटकंती करत असतो.त्यांच्या असणाऱ्या न्याय मागण्यांमध्ये वैदु समाज स्वतंत्र अर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे,वैदु भवनासाठी,तिर्थक्षेत्र “मढी, जेजूरी,माळेगाव,राजे देऊळगाव,याठिकाणी भवनासाठी जागा मिळावी, ॲट्रॉसिटी सारखे कवच वैदु ‘समाजासाठी संरक्षण मिळावे,जातीचे दाखले मिळवण्यासाठी १९६१ चा कायदा शिथील करून, घरपोहच दाखले मिळावेत, गृहचौकशी करून जातपडताळणी दाखला मिळावा,नॉनक्रिमिनल दाखल्याची अट रद्द करावी, वैदु समाज रोजगारासाठी गावोगाव फिरतात,त्यांना तहसीलदार यांच्या कडून ओळखपत्र देण्यात यावे,भूमिहीन लोकांना प्रत्येकी २ हेक्टर प्रमाणे व शासकीय जागा अतिक्रमित असेल तर कायम स्वरूपी करण्यात यावे.प्रत्येक जिल्हयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे,समाजातील शिक्षित, अर्धशिक्षित,अकुशल धारकांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्राधान्य द्यावे, यशवंतराव चव्हाण, ” मुक्त वसाहत,तांडा योजने अंतर्गत, वैदु समाजात शहरी तसेच ग्रामिण भागात घरकूल योजना देण्यात यावी.

रोहिनी कमिशनच्या निर्देशानुसार वैदू समाजाला अवलंबीनात यावे, त्यानुसार सब कॅटेगिरी करण्यात यावे,पुढील प्रमाणे वैदु समाजाला केंद्रामध्ये अत्यंत मागासलेल्या वर्गात समाविष्ठ करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा या परिवर्तन मेळाव्यात मांडल्या जाणार आहेत.वैदू समाजाला न्याय मिळावा म्हणून केंद्र व राज्य सरकारने दखल घेऊन संसदेत व विधीमंडळात मागण्या संमत करून वटहुकूम काढावा अन्यथा संपूर्ण भारतातील वैदू समाज एक होऊन आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत महाराष्ट्रतील सर्व समाज संघटना एकत्रित करून हा लढा जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही.

मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांची मोलाचे योगदान आहे.तरी संपूर्ण भारतातील वैदू समाज लाखोंची संख्येने मढी या ठिकाणी मेळाव्यास उपस्थिती राहावे असे आवाहन लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे.यावेळी महाराष्ट्र मढी मेळावा नियोजिन समिती अध्यक्ष व लेखक बाबा चव्हाण,महाराष्ट्र कार्याध्यक्ष नारायण शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, खजिनदार राहुल शिंदे, पत्रकार नागेश शिंदे,नाथा लोखंडे,संजय धनगर व समाज बांधव इ.उपस्थित होते.

You cannot copy content of this page