
अहमदनगर (दि.४ एप्रिल):- गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन शहरातील क्लेरा ब्रुस मैदान येथे थांबलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोतवाली पोलीसांनी अटक केली आहे.
हि कारवाई ४ एप्रिल २०२४ रोजी झाली आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना या संदर्भात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार पोनि/दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी आरोपी असलेल्या ठिकाणी गेले असता आरोपीच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला होता.
पथकाने त्यास जागीच ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बिरज्या उर्फ बिरजु राजु जाधव (रा.मकासरे चाळ, कोठी-स्टेशन रोड,पाटील हॉस्पीटलचे पाठीमागे, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.पोकॉ/प्रमोद लहारे यांचे फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 447/2024 शस्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास सपोनि/योगिता कोकाटे या करित आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाच्या सपोनि/योगीता कोकाटे,पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,पोहेकॉ/ए.पी.इनामदार,संदिप पितळे, पोना/अविनाश वाकचौरे, म.पो.ना./संगिता बडे,पोकॉ/ दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे,तानाजी पवार,प्रमोद लहारे,अतुल काजळे,सुरज कदम,सचिन लोळगे,अमोल गाडे,सुजय हिवाळे यांनी केली आहे.