
अहमदनगर (दि.४ एप्रिल):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने दि.२ व ३ एप्रिल रोजी मोठी कारवाई केली आहे.
यात संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी,राहता तालुक्यातील राहता परिसर गणेश नगर,श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव,राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द,नेवासा तालुक्यातील सोनई,पानेगाव,पानसवाडी गावठी निर्मिती केंद्रावर तसेच अवैध देशी,विदेशी दारू व ताडी विक्री करणाऱ्या केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून तब्बल १ लाख ७२ हजार ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ८ आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने,उपअधीक्षक श्री.प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर निरीक्षक श्री.अनुपकुमार देशमाने,दुय्यम निरीक्षक श्री.जी.एन.नायकोडी,दुय्यम निरीक्षक श्री.एस.एस.पवार,जवान टी.आर.शेख,महिला जवान श्रीमती.एस.आर.फटागरे,वाहन चालक एन.एम.शेख यांनी केली आहे.अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध धाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती भरारी पथक क्र.२ श्रीरामपूर निरीक्षक श्री.अनुपकुमार देशमाने यांनी दिली.