
अहमदनगर (दि.३ एप्रिल):-निवडणुक कुठलीही असो,बुथ प्रमुखाचे काम महत्वाचे असते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्यांच्या मतदार संघातील बुधचे अध्यक्ष आहेत.भारतीय जनता पार्टीमध्ये बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख,सुपर वॉरियर्स, समिती प्रमुख,मोर्चा आघाडी आणि विस्तारक यांना अनन्य साधारण महत्व आहे.
निवडणुकीमध्ये या सर्व घटकांची सांगड घातली तर बुथवर ६० टक्क्याहून अधिक मतदान पक्षाला होऊन विजयाचा मताधिक्क्यात वाढ नक्कीच होईल असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाच्या वतीने नगर शहरात प्रभाग निहाय तपशिलवार बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत प्रभाग १ मध्ये सावेडी उपनगरातील पुण्यश्लोक नगर येथे आयोजित पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर आव्हाड, सरचिटणीस प्रशांत मुथा, सावेडी मंडल अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन शेलार, सुपर वॉरियर्स अनिल ढवण, निशांत दातीर,बुथप्रमुख सचिन कुसळकर,चिन्मय पंडित,अतुल लांभाते, तुषार यादव, गणेश भगत, मयुर बोळे,सागर कोल्हे,तसेच प्रशांत भालेराव,राजेंद्र तागड, ऋषी ढवण,सचिन खाटेकर, सागर पोळ,रोहन ढवण, बाळासाहेब तागड,चंद्रकांत फणसे,पंकज बाहेती, बाळासाहेब तागड,दिपक कजबे,कुणाल कुलकर्णी, भुषण चित्तर,स्वप्नील दिवटे, मनोज भांड,अमर बामदळे, संदिप क्षीरसागर,आदिनाथ बर्डे,अदित्य भोंडवे,कृष्णा कजबे आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना आगरकर म्हणाले, निवडणुकीमध्ये आपल्या बुथवर आपण लक्ष केंद्रीत करुन,मतदान वाढीसाठी मतदारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, या करिता नागरिकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे.प्रारंभी सरचिटणीस प्रशांत मुथा यांनी पक्षांतर्गत आगामी काळात घेण्यात येणार्या कार्यक्रमांची माहिती विस्तृतपणे सांगितली.६ एप्रिल रोजी भाजपाचा स्थापना दिवस असून,या दिवशी भाजपाच्या पदाधिकार्यांनी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.