
अहमदनगर (दि.३ एप्रिल):- आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची जिल्ह्यात विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणा-या इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती.
पथकांनी कारवाई करून एकुण ९५ गुन्हे दाखल करुन १०० आरोपींचे ताब्यातुन 11 लाख 37,961/- रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त केली आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.