लोकसभा आचारसंहितामुळे जिल्हापरिषदेच्या पदभरतीला ब्रेक
अहमदनगर (दि.५ एप्रिल):-अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये तब्बल दहा वर्षानंतर पदभरती निघाली. लाेकसभेपूर्वी दोन महिन्यात सर्व प्रक्रिया होऊन सर्वांना नियुक्तीपत्र दिले जातील,अशी अपेक्षा होती.
परंतु,आठ महिने झाले तरी,अद्याप एकालाही नियुक्ती मिळालेली नाही.विशेष म्हणजे अजून ८० टक्के पदांची परीक्षा बाकी असून आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरतीला ब्रेक लागला आहे.जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील ९३७ पदे भरण्यात येणार आहेत.त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत.
यासाठी जिल्ह्यातून ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले.यातील १६९ जागांसाठी डिसेंबर २०२३ पर्यंत परीक्षा झाली.परंतु अद्याप उर्वरित ७७८ जागांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.त्यामुळे ही भरती कधी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.