चौक सभेचे नियोजन न झाल्याने निलेश लंके नाराज
पाथर्डी (प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ५ एप्रिल रोजी मा.निलेश लंके यांच्यासाठी चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. मा.आ.निलेश लंके यांच्या कडून मतदारांच्या भेटीगाठीचे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने चौक सभेचे देखील नियोजन होते परंतु चौक सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त करत शिरापूरकडे रवाना झाले.यावेळी आमदार तनपुरे देखील त्यांच्या सोबत होते.याची दिवसभर तिसगावमध्ये चर्चा सुरू होती.