Maharashtra247

बांधकाम साईटवरील प्लंम्बिंग व इतर साहित्याची चोरी करणारे तिघे मुद्देमालासह जेरबंद एलसीबीची कारवाई

अहमदनगर (दि.४ एप्रिल):-गुलमोहर रोड येथील बांधकाम साईटवरील प्लंम्बिंग व इतर साहित्याची चोरी करणाऱ्या ३ आरोपींना 2 लाख 24,200/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकिगत अशी की,घटनेतील फिर्यादी श्री. मकरंद कृष्णाजी देशपांडे (धंदा बांधकाम व्यवसाय,रा.समर्थ शाळे समोर,सावेडी,अहमदनगर) यांचे किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड,अहमदनगर येथे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणावरुन कोणीतरी अनोळखी चोरट्याने 2,51,000/-रुपये किंमतीचे नळ,कॉक,वायर बंडल,ड्रिल मशिन,ग्राईंडींग मशिन व ब्रेकर चोरुन नेले बाबत तोफखाना पो.स्टे.येथे गु.र.नं. 408/2024 भादविक 380, 457 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील ना उघड गुन्ह्यांचा समांतर तपास करुन, सदर गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार संदीप पवार,मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुन ना उघड गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पथकास सदर गुन्हा हा इसम नामे अभिमन्यु कुसळकर रा. सावेडीनाका, अहमदनगर याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन ते सुझुकी शोरुम मागे, सावेडीनाका परिसरात फिरत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सावेडी नाका परिसरात जावुन संशयीत इसम नामे अभिमन्यु कुसळकर याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन बातमीतील वर्णना प्रमाणे 3 संशयीतांना सावेडीनाका परिसरातुन शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अभिमन्यु विलास कुसळकर रा.सुझुकी शोरुम मागे, सावेडी नाका, अहमदनगर, 2)कृष्णा सुजय कु-हाडे रा.झोपडी कॅन्टींग, अहमदनगर व 3)अजय रुस्तुम शिंदे रा.कुरेशी हॉटेल मागे, कोठला अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगुन गुन्ह्यात चोरी केलेला 88,200/- रुपये किंमतीचे वायर बंडल, 50,000/- रुपये किंमतीचे कॉक, 6,000/- रुपये किंमतीचे ड्रील मशिन व गुन्हा करताना वापरलेली 80,000/- रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,24,200/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन, तोफखाना पो.स्टे.गु.र.नं. 408/2024 भादविक 380, 457 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले.

पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page