
अहमदनगर (दि.५ एप्रिल):-दि.५ एप्रिल रोजी गुडीपाडवा,रमजान ईद,जागणे की रात,महात्मा फुले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,श्रीराम नवमी व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भिंगार कॅम्प पो.स्टे.हद्दीत मुकूंदनगर भागात इरिगेशन, मस्जिद-बॉम्बे बेकरी,दरबार चौक,सहारा कॉर्नर,नगरी चहा,फकीरवाडा रोड,वाबळे कॉलनी व इरीगेशन मस्जिद तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान,खळेवाडी,नेहरु चौक,शिवाजी चौक,ब्राम्हण गल्ली,भिंगार वेस,गवळीवाडा,सदर बाजार,येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा उपस्थित होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर श्री.अमोल भारती,भिंगार कॅम्प पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी श्री.योगेश राजगुरु, कॅम्प पोलीस स्टेशनचे २ अधिकारी व ४० अंमलदार तसेच BSF चे बटालीयन कमाडंट,डयेप्यु.कमाडंट,असिकमाडंट तसेच ५० जवान व क्युआरटी प्लाटुनचे २५ जवान उपस्थित होते.
