पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या शहर अध्यक्षपदी संजय साळवे यांची निवड
अहमदनगर (दि.५ एप्रिल):- पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी संजय सुधाकर साळवे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुमेध भाई गायकवाड यांनी श्री.साळवे यांना निवडी पत्र दिले.त्यांच्या निवडी बद्दल पक्षाचे नेते प्रा. जयंत गायकवाड,नितीन कसबेकर,महिला जिल्हाध्यक्षा सौ.गौतमी भिंगारदिवे,महेश भोसले,नितीन साळवे, विशाल गायकवाड,किरण गायकवाड आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
यावेळी नूतन शहराध्यक्ष संजय साळवे म्हणाले शहरात पक्ष वाढवण्यासाठी या पदाचा योग्य वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले की नूतन शहराध्यक्ष तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते असल्याने याचा पक्षाला फायदा होणारच आहे व यातून तरुणांनाही पक्षात काम करण्याची मोठ्या प्रमाणात संधी मिळेल.