संगमनेरच्या मंगेश भालेराव यांची चित्रपट सृष्टीत उंच भरारी:भालेराव यांनी हिवरगाव पावसा गावचा नावलौकिक वाढवला
संगमनेर (नितीन भालेराव):-हिवरगाव पावसा गावचे भूमिपुत्र मंगेश श्रीकांत भालेराव यांनी चित्रपट सृष्टीत अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे.त्याच्या मार्गदर्शनाखाली चारशे चित्रपट रिलीज झाले आहेत.नटरंग, दबंग-१,दबंग-२,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका असलेला ए.बी.सी.डी,या सारखे अनेक चित्रपट मंगेश श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली रिलीज झाले आहेत.
भूमिपुत्र मंगेश श्रीकांत भालेराव यांनी चित्रपट सृष्टीत मोठे यश मिळवत हिवरगाव पावसा गावाचा नावलौकिक वाढवला आहे.मंगेश यांचे वडील आंबेडकर चळवळीतील जेष्ठ पदाधिकारी श्रीकांत तबाजी भालेराव यांच्याकडून सामाजिक कार्याचा वारसा मिळाला आहे.आरपीआय चे राज्य उपाध्यक्ष तथा अ.नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत ताबाजी भालेराव हे ५० वर्षापासून आंबेडकर चळवळीत राज्यस्तरावर कार्य करत आहे.
हिवरगाव पावसा गावचे भूमिपुत्र मंगेश श्रीकांत भालेराव यांच्या ४८ व्या वाढदिवसा निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या,बौद्ध धम्म गुरु भन्ते डॉ.राहुल बोधी यांनी विडिओ कॉन्फरेन्स द्वारे संपर्क करून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक,राजकीय,चित्रपट सृष्टीतील मान्यवरांकडून मोठ्याप्रमाणात वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,वृक्षमित्र गणपत पावसे सर,शिवसेना(शिंदे) जिल्हाध्यक्ष मागासवार्ग सेल सोमनाथ भालेराव,सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे,रंजना भालेराव,रोहिणी भालेराव,यादवराव पावसे,बाळासाहेब भालेराव,विलास कदम,मन्सूर इनामदार,राजू दारोळे,अभिजित भालेराव,बच्चन भालेराव,विकास दारोळे,राजू भालेराव यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.