शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी पंच देण्यासाठी टाळाटाळ तारकपूर बसस्थानक नियंत्रकावर तोफखान्यात गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.७ एप्रिल):-शासकीय कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणुन पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असताना छापा कामी पंच देण्याचे उद्देशपुर्वक टाळाटाळ केल्याने तारकपुर बस स्थानक नियंत्रका विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.६ एप्रिल रोजी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक इसम मानसिक समतोलावर परीणाम करणारे पदार्थ (गांजा) हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगुन असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना मिळाली.त्यावर पोनि/कोकरे यांनी छाप्याचे नियोजन करुन छाप्यासाठी पंच मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख,तारकपुर आगार,अहमदनगर यांना लेखी पत्र पोलीस अंमलदारामार्फत तारकपुर बस आगार येथे सादर केले.
तारकपुर बस स्थानक नियंत्रक कक्षात असलेले श्री.भालेराव (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांना पंच म्हणुन कर्मचारी मिळणे बाबत लेखी रिपोर्ट सादर असता त्यांनी पंच म्हणुन कोणत्याही कर्मचाऱ्यांना न कळविता पंच देण्यास उद्देशपुर्वक टाळाटाळ केली.
महाराष्ट्र शासन, गृह विभाग,शासन निर्णय क्रमांक.डीपीपी-2012/प्र.क्र.10/पोल-10 मंत्रालय, मुंबई दि.12/05/2015 अन्वये सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणुन देण्याबाबत आदेश असताना देखील तसेच लोकसेवक म्हणुन सार्वजनिक कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणुन पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असताना छापा कामी पंच देण्याचे उद्देशपुर्वक टाळाटाळ करण्याचे कृत्य केले तसेच इतर कर्मचाऱ्यांना पंच होण्यापासुन परावृत्त करण्यासारखे कृत्य केल्याने तोफखाना पोलीस स्टेशन येथे प.नॉ.कॉ.रजि.नं-681/2024 भा.दं.वि.क.187 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.