Maharashtra247

महायुतीचे उमेदवार खा. डॉ.सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी…

अहमदनगर (दि.७ एप्रिल):-अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या सामन्यात आता रंगत वाढत चालली असून दोन्ही उमेदवार सध्या अहमदनगर जिल्ह्यासह जे मतदार बाहेर आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रचार करण्यात आघाडीवर आहेत.सध्या महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांमध्ये चांगलेच सोशल मीडियावर सुरू आहे.

एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेत्यांचे समर्थक सोडत नाहीत.निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे सध्या प्रत्येक ठिकाणी निवडणुकीची चर्चा सुरू आहे शहराच्या पान टपरी पासून ते गावातील पारावर बसलेल्या ग्रामस्थांमध्ये सुद्धा कोण निवडून येणार अशी चर्चा सुरू आहे.

अशाच एका चर्चेवरून थेट खासदार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.मात्र महाराष्ट्र न्यूज २४/७ या ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही.

You cannot copy content of this page