नीलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बुद्ध भीम गीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन;ख्यातनाम गायिका सुषमा देवी आणि पार्टी यांच्या गीतांचा होणार कार्यक्रम
अहमदनगर (दि.९ एप्रिल):-गेली ३५ ते ४० वर्षापासून नगर शहरात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करत यंदा निलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त उद्या बुधवारी दि.१० रोजी महाराष्ट्राच्या ख्यातनाम सुप्रसिद्ध स्वर सम्राज्ञी ‘कुंकू लावील रमान’ आणि ‘सोन्याने भरली ओटी’ या गीताच्या गायिका सौ.सुषमा देवी यांचा सुमधुर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
सदरील कार्यक्रम हा दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वा.गौतम नगर निलक्रांती चौक येथे आयोजित केलेला आहे.तरी या कार्यक्रमाला समाज बांधव उपासक उपासिका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नीलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने तसेच माजी नगरसेवक अजयराव साळवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.