मांजरसुंबा गावात बालविवाह जागृती कार्यक्रम संपन्न…
अहमदनगर (दि.११ एप्रिल):-जिल्ह्यात बालविवाह जनजागृती करून मोठ्या संख्येने बालविवाह रोखण्यासाठी उडान प्रकल्प स्नेहालय संस्थे अंतर्गत काम सुरू आहे.
मोठ्या स्तरावर जनजागृती करून अनेक लोकांपर्यंत बालविवाह आणि बालकांचे अधिकारा विषयी प्रबोधन करण्यात येत आहे.
याच प्रमाणे दि.११ एप्रिल रोजी मांजरसुंबा या गावातील उमेद प्रकल्पांतर्गत चालवले जाणारे महिला बचत गटातील महिलामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी जनजागृती कार्यक्रम स्नेहालयचे उडान व कृषी मित्र प्रकल्प,मांजरसुंबा ग्रामपंचायत आणि उमेद प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.या वेळी उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा विषयी सविस्तर माहिती देऊन बालविवाह मुळे आयुष्य आणि भविष्य उध्वस्त होतात. बालकांचे हक्काचे आणि अधिकारांचे सुद्धा बालविवाह उल्लंघन होते.
शासकीय यंत्रणा आणि योजना बदल माहिती सागितले.स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. तसेच कृषी मित्र भारत कदम यांनी शेंद्रिय शेती बदल माहिती सांगितली.यानंतर मांजरसुंबाचे सरपंच सौ.रुपाली अर्जुन कदम यांनी स्नेहालय पदाधिकऱ्याचे आभार मानले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपसरपंच श्री.जालिंदर मच्छिंद्र कदम,ICRP जयश्री बाबासाहेब कदम,सुनिता राजेंद्र कदम,महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा अर्चना अशोक कदम,सचिव अनिता पिरीताजी कदम,कोषाध्यक्ष तृप्ती रेवणनाथ कदम इ.उपस्थीत होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असिफ सय्यद,भारत कदम,शाहिद शेख, शशिकांत शिंदे, पूजा झिने यांनी परिश्रम घेतले.