राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या दुहेरीत संगमनेरच्या ध्रुव भालेरावची सुवर्ण कामगिरी;वाराणसी येथे ४६ व्या सबज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व
संगमनेर (नितीन भालेराव):-वाराणसी येथे ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ४६ व्या सब ज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी केली.या स्पर्धेत दुहेरीत संगमनेरच्या ध्रुव भालेराव व रत्नागिरीच्या द्रोण हजारे या जोडीने सुवर्ण मिळवले.सलग पाच सामने जिंकत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली.अंतिम सामन्यात उत्तरप्रदेश च्या संघाचा ३-0 असा पराभव केला.
वाराणसी येथे ४६ व्या सब ज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सेमीफायनल मध्ये पॉन्डेचरी च्या संघाचा 3-0 असा पराभव केला.या स्पर्धेच्या दुहेरीत संगमनेरच्या ध्रुव भालेराव व रत्नागिरीच्या द्रोण हजारे या जोडीने सलग पाच सामने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली.अंतिम सामन्यात बुद्धी आणि कौशल्याच्या बळावर उत्तरप्रदेश च्या संघाचा ३-0 असा दणदणीत पराभव केला.
ध्रुव संतोष भालेराव याचे कुटुंबीय मुळचे संगमनेरच्या हिवरगाव पावसा या गावचे सध्या पिपंळगाव कोन्झीरा येथे वास्तव्यास आहे. ध्रुव भालेराव हा डॉ.अँटॉनिओ दासिल्वा हायस्कूल व जुनिअर कॉलेज दादर ,मुंबई येथे इ.८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. ध्रुव भालेराव दोन वर्षापासून शालेय शिक्षणाबरोबर कॅरमचा सराव करत खेळतील बारकावे आत्मसात करत आहे. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने तालुका,जिल्हास्तर,राज्यस्तरावर यश संपादन केले. चमकदार कामगिरी मुळे ४६ व्या सब ज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात ध्रुव भालेराव ची निवड झाली.या यशामध्ये ध्रुव ला मुलुंड चे संजय बर्वे (बाबा) तसेच वरळीच्या मानसी शिंदे (काकी) आणी पुणेे येथेेल नन्दु सोनवणेे (सर) टीम मॅनेजर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत सराव सुरु होता.
सब ज्यूनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत ध्रुव भालेरावच्या चमकदार कामगिरीमुळे संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ध्रुव भालेरावच्या सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव तसेच हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे, शिवसेना(शिंदे) जिल्हाध्यक्ष मागासवार्ग सेल सोमनाथ भालेराव, कला सम्राज्ञी पवळा कलामंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,वृक्षमित्र गणपत पावसे सर,सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे, देवगड खंडोबा ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, पी. आय. नारायण पावसे, यादवराव पावसे,बाळासाहेब भालेराव,विलास कदम,मन्सूर इनामदार,शंकर भालेराव,राजू दारोळे,अभिजित भालेराव,बच्चन भालेराव,विकास दारोळे,यांच्या सह हिवरगाव पावसा व पिपंळगाव कोन्झीरा ग्रामस्तांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.