तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त
अहमदनगर (दि.१२ एप्रिल):-संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्नसुरक्षा विभागाने छापा टाकून तब्बल ३ लाखांचा गुटखा जप्त केला आहे.
याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,कोल्हेवाडी रोड परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका खोलीत २ लाख ४० हजाराचे हिरा पान मसाल्याचे २ हजार पॅकेट व ६० हजाराचे रॉयल ७१७ तंबाखूचे २ हजार पॅकेट, असा ३ लाखांचा मुद्देमाल पांढरा व हिरव्या गाण्यांमध्ये साठवून ठेवण्यात आला होता.
अन्न सुरक्षा विभागाने या ठिकाणी छापा टाकून हा गुटखा जप्त केला.याबाबत अन्नसुरक्षा विभागाचे प्रदीप पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुटखा विक्रेता रईस सरदार तांबोळी (वय ४९, कुंभार गल्ली, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.