गावठी कट्टयासह आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
अहमदनगर (दि.११ एप्रिल):-आगामी लोकसभा निवडणुकचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.पोलीस पथक तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र,हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत वडगांव तांदळी शिवारातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व पांढरे रंगाची जिन्स पँट घातलेल्या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तात्काळ हॉटेल निसर्ग या ठिकाणी जावुन खात्री करता बातमीतील वर्णनाचा इसम हा हॉटेलमध्ये संशयीतरित्या मिळुन आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेवुन त्यास त्याचे पुर्ण नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव शहाजी निवृत्ती जाधव (रा. राजेगांव,ता.केज,जि.बीड, हल्ली रा.हॉटेल निसर्ग, वाटेफळ,ता.जि.अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची अंगझडती घेता त्याचे डावे कमरेस खोचलेले 30,000/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व पिस्टलचे मॅग्झिनमध्ये 3000/- रुपये किमतीचे 03 जिवंत काडतुसे असा एकुण 33,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द पोकॉ/97 मयुर दिपक गायकवाड नेम-स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 381/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संदीप पवार,रविंद्र कर्डीले, मयुर दिपक गायकवाड, विशाल आण्णासाहेब तनपुरे, संतोष खैरे यांनी केली आहे.