Maharashtra247

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त १२ एप्रिल रोजी सर्जेपुरा येथे डॉ.बी.आर.आंबेडकर श्री २०२४ शरीर सौष्ठव बॉडी शो चे आयोजन 

अहमदनगर (दि.११ एप्रिल):-सालाबाद प्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या आनंदात उत्साहाने शहरात साजरी होत आहे.

तरुण पिढीला व्यसनातून मुक्त होऊन व्यायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान (ट्रस्ट) कॅम्प कौलारू सर्जेपुरा अहिल्यानगर यांच्या वतीने भव्य शरीर सौष्ठव बॉडी शो स्पर्धेचे आयोजन दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता केले आहे.

हा कार्यक्रम सर्जेपुरा चौक एमजी रोड अहिल्यानगर येथे होणार आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गायकवाड व तुकाराम भाऊ गायकवाड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page