
अहमदनगर (दि.१२ एप्रिल):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यातील अग्नीशस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पथक पारनेर हद्दीत संशयतांची माहिती घेत असताना पारनेर पोलीस स्टेशनचे सपोनि/श्री. खंडागळे यांनी पथकास पारनेर पो.स्टे.गु.र.नं. 263/24 आर्म ऍ़क्ट 3/25 या गुन्ह्यात पोलीस कस्टडीत असलेला आरोपी नामे रोहित शिवाजी गवळी,रा.पारनेर याचे कब्जात मिळुन आलेले गावठी पिस्टल हे त्याचा साथीदार नामे प्रमोद किसनराव भस्के रा.मरकळ, ता. खेड,जिल्हा पुणे याचे कडुन खरेदी केले असुन सदर आरोपी हा पुणे येथून अहमदनगर कडे त्याचे कडील स्विफ्टगाडी मधुन येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याचे सांगुन सदर स्विफ्टकार अडवुन प्रमोद भस्के हा मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेणे बाबत कळविले.
स्थागुशा पथकास सपोनि/श्री.खंडागळे यांनी दिलेल्या माहितीचे अनुषंगाने पथकाने पारनेर पोलीस स्टेशनचे गहिनीनाथ यादव, विवेक दळवी,मयुर तोरडमल व पंचाना सोबत घेवुन अहमदनगर ते पुणे जाणारे रोडवरील गव्हाणवाडी फाटा येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात बातमीतील वर्णना प्रमाणे 1 कार भरधाव वेगात पुणेकडुन अहमदनगरचे दिशेने येताना दिसली. पथकाचा संशय बळावल्याने कार चालकास गाडी थांबविणे बाबत हाताने इशारा करता कार चालकाने पथका पासुन थोड्या अंतरावर कार थांबवुन गाडीमधील 3 इसम खाली उतरुन पळुन जावु लागले.
पथकाने त्यांचा पाठलाग करुन,त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) प्रमोद ऊर्फ अंकित किसनराव भस्के रा.मरकळ, ता.खेड,जिल्हा पुणे, 2) दिपक गोविंदा पाटील रा. चाकण,ता.खेड,जिल्हा पुणे व 3) माऊली दादासाहेब भांबरे रा.आळंदी,ता.खेड,जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता इसम नामे प्रमोद किसनराव भस्के याचे अंगझडतीमध्ये 1 गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व 2 जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याबाबत अधिक विचारपुस करता त्याने त्याचे साथीदारासह गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करीता आणल्याचे सांगितल्याने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.आरोपींचे कब्जातुन 30,000/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा (अग्नीशस्त्र), 2,000/- रुपये किंमतीची 2 जिंवत काडतुस व 4,00,000/- रुपये किंमतीची स्विफ्ट कार असा एकुण 4,32,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपींना मुद्देमालासह पारनेर पो.स्टे.गु.र.नं. 263/24 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हेपोउपनि/सोपान गोरे व अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे,रविंद्र कर्डीले, अतुल लोटके,देवेंद्र शेलार, संतोष खैरे,विजय ठोंबरे, बाळासाहेब गुंजाळ व संभाजी कोतकर व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.