
अहमदनगर (दि.१२ एप्रिल):-नगर शहरातील नीलक्रांती चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुरू असलेल्या असलेल्या कार्यक्रमात गाणे लावण्यावरून चांगलाच गोंधळ झाला.
गाणे बंद करा आणि दुसरे गाणे लावा असे म्हणत तरुणाने गोंधळ घातला तसेच त्या ठिकाणच्या काही खुर्च्या फेकून देण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.तसेच या ठिकाणी दोन गटात चांगलीच हाणामारी झाल्याची माहिती समजतेय.
ही घटना समजताच कोतवाली पोलीस स्टेशन,तोफखाना पोलीस स्टेशन व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली यामुळे पुढील अनर्थ टळला.