
अहमदनगर (दि.१२ एप्रिल):-एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडगाव गुप्ता शिवारात हेमचंद रामकृष्ण इंगळे यांच्या मालकीच्या जागेत बाळासाहेब कराळे यांनी ट्रॅक्टरने रस्ते खोदून तेथे सुशोभीकरणा अंतर्गत उभारलेले पोल पाडून प्रचंड नुकसान केले.
तसेच त्यानंतर घटनेतील फिर्यादी हेमचंद्र इंगळे यांचा मुलगा धवल यास वारंवार फोन करून जागेचे दोन लाख रुपये दे असे म्हणत त्या जागेवर कोणतीही कामकाज करायचे नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली केली.
या बाबत हेमचंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाळासाहेब कराळे यांच्या विरुद्ध गुरन ३६८/२०२४ भादवीक ३८५,४४७,४२७,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक पालवे हे करीत आहेत.