
श्रीगोंदा प्रतिनिधी (१३ एप्रिल):-श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर येथील भीम अनुयायीं व समाज बांधवांच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उस्तहात,विविध सामाजिक उपक्रमांसह व्यापक स्वरूपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

माजी उनगराध्यक्ष संग्राम घोडके,माजी नगरसेविका सोनालीताई हृदय घोडके,हृदय गौतम घोडकेंसह समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थनगर,श्रीगोंदा येथे तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४’ चे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके आणि खजिनदार विशाल गौतम घोडके यांनी प्रसार माध्यमांना प्रसिध्दी दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.त्यांनी नमूद केल्या प्रमाणे दि.१३ एप्रिल २०२४ रोजी रात्री १२:०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रतिमांना शहरातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, पत्रकारिता,प्रशासकिय पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आणि समाजातील नागरीक अभिवादन करणार आहेत.दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत धम्म पूजापाठ संपन्न होईल.त्यानंतर ९:०० वाजता जिल्हा परीषद प्राथमिक शाळा सिद्धार्थनगरच्या शाळकरी मुलांकडून झांज पथक आणि लेझिम खेळाचे सादरीकरण संदीप मोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारं आहे. पुढे ९:३० वाजता प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथुन झेंडा चौक-संत रोहिदास चौक – शिवाजी चौक – शनीचौक – जोधपूर मारुती चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत सिद्धार्थनगर येथ कार्यक्रम स्थळी संपन्न होईल.याच दिवशी दुपारी १:०० वाजलेपासून सायंकाळी १२:०० वाजेपर्यंत भोजनदानं करण्यात येणार असुन, तालुक्यातील तमाम भीम बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेण्याचे आवाहन उस्तव समितीचे अध्यक्ष आणि आयोजकांनी केले आहे.
सदरील अन्नदान चंद्रमा पेट्रोल पंपाचे संचालक श्री.संजय जगधने सर यांनी सामाजिक भावनेतून सदिच्छा दिल्याचे सांगितले आहे.सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा येथील समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न होणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव,समितीचे अध्यक्ष अजय रोहिदास घोडके यांच्या नेतृत्वाखाली तसेच,माजी उनगराध्यक्ष संग्राम घोडके, माजी नगरसेविका सोनालीताई हृदय घोडके, हृदय गौतम घोडके, विशाल घोडके (खजिनदार), सुनिल भागचंद घोडके, अविनाश आकाश घोडके, लक्ष्मण घोडके, भगवान घोडके, जिवाजी भानुदास घोडके, धरमजी घोडके, किरण घोडके, गोरख जालिंदर घोडके, विलास घोडके, सागर मोरे, पप्पू घोडके, श्रीकांत घोडके, सचिन नामदेव घोडके, योगेश सुनिल घोडके, सनी राजू घोडकेंसह अक्षय राजु घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
या जयंती उत्सवाचे विशेष आकर्षण संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला लेजर शो आणि साऊंड सिस्टीम (KV9.. खेड, मंचर.. पुणे) ठरणार असुन,शहरासह तालुक्यातील तमाम ग्रामस्थ, समाज बांधव आणि भीम अनुयायींनी उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४ श्रीगोंदा’ यांनी केले आहे.