Maharashtra247

पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एकावर चाकूने सपासप वार….

अहमदनगर (दि.१६ एप्रिल):-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव गुप्ता शिवारात पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून तरुणाकडून वयोवृद्ध इसमावर चाकूने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही घटना १५ एप्रिल रोजी वडगाव गुप्ता शिवारात डोंगरे वस्ती जवळ शेंडी बायपास येथे घडली आहे.घटनेतील जखमी इसमाचा मुलगा तुषार अशोक शेळके (रा.वडगाव गुप्ता) याने दिलेल्या फिर्यादीवरून निखिल शिवाजी गांगर्डे (रा.वडगाव गुप्ता) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरन ३७५/२०२४ भादवीक ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनी/माणिक बी. चौधरी हे करत आहे.

You cannot copy content of this page