‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्या संकल्प पत्राचा आत्मा:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
नगर (दि.१६ प्रतिनिधी):-भाजपाचे संकल्प पत्र देशातील सर्वसामान्य नागरीक,महिला,युवक आणि शेतकरी यांना समर्पित झाले असून,संकल्प पत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा भाव भाजपाच्या संकल्प पत्राचा आत्मा असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संकल्प पत्राची माहीती मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांना दिली. भाजपाच्या संकल्प पत्रासाठी देशातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत,यासाठी सुचना पाठविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देवून, संपुर्ण देशातून १६ लाख सुचना यासाठी प्राप्त झाल्या. नगर जिल्ह्यातूनही १० हजार सुचना संकल्प पत्रासाठी पाठविण्यात आल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
नागरीकांच्या सुचनांमधून तयार झालेल्या या संकल्प पत्रात भारताच्या अंतरराष्ट्रीय संबधापासून ते देशाच्या सुरक्षा व्यवस्थेपर्यंत. समृध्द भारत,सुशासन,स्वस्थ भारत, शिक्षण,क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाबरोबरच इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून ना.विखे पाटील म्हणाले की,२०४७ सालापर्यंत विकसीत भारत निर्माण करण्याचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती,शेतकरी आणि गरीब यांना सशक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून,रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करतानाच स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.भारताला प्रक्रीया उद्योगाचे हब बनवून प्रक्रीया उद्योग ग्रामीण अर्थकारणाचे ग्रोथ इंजिन ठरेल असे उदिष्ठ या संकल्प पत्रातून ठेवण्यात आले असून, संस्कृती आणि परंपरेची जोपासणा करतनाच देशातील पर्यटन विकासाला गती देण्याचा मानस संकल्प पत्रातून व्यकत करतानाच मागील दहा वर्ष देशातील महिलांना संधीचे होते. आता भविष्यातील पाच वर्षे हे महिलांच्या भागीदारीचे असतील.
याकरीता नारीशक्ती वंदना अधिनियम पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या सरकारची मोठी उपलब्धी ठरली असल्याचे विखे पाटील म्हणाले.भाजपाच्या संकल्प पत्राच्या अनुषंगानेच लोकसभा मतदार संघांचा वचननामाही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून,जिल्ह्यात रोजगार निर्मिती, तिर्थक्षेत्र पर्यटन तसेच जिल्ह्यातील प्रलंबित पाणी योजनांच्या सोडवणूकीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हा ध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, धनंजय जाधव, निखील वारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.