
अहमदनगर (दि.१६ एप्रिल):-पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद दरोडा प्रकरणी ६ आरोपीना २ लाख ६८,५००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आलेले आहे.यात आरोपींनी ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि.१५ एप्रिल रोजी घटनेतील फिर्यादी श्री.वसंत गणपत जवक (रा.रांजणगांव मशिद, ता.पारनेर) हे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी ६ इसमांनी फिर्यादीचे यांच्या खोलीचे लोखंडी दरवाजाची कडी उघडुन आत प्रवेश केला व फिर्यादीसह कुटूंबियांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण व जखमी करुन घरातील रोख रुपये व सोन्याचे दागिने इतर घरगुती साहित्य चोरी करुन नेले बाबत सुपा पो.स्टे. येथे गु.र.नं. 187/2024 भादविक 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री.राकेश ओला पोलीस अधीकक यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखेतील 2 विशेष पथके तयार करुन पथकास आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
स्थागुशा पथकांनी फिर्यादी व त्यांचे कुटूंबियाकडुन आरोपींचे वर्णन,आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व गेलामाल याबाबत माहिती घेवुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना वरील प्रमाणे गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे रमेश भोसले रा.कामरगांव, ता.नगर याने त्याचे इतर साथीदारासह केला असुन आरोपी कामरगांव शिवारातील नगर पुणे रोडवरील हॉटेल संतोष जवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदारांना सोबत घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने कामरगांव शिवारातील हॉटेल संतोष येथे सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात विठ्ठलवाडी रोडने बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम पायी येताना पथकास दिसला.पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागुन तो पळुन जावु लागताच अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता संशयीताने 2 दिवसांपुर्वी त्याचे इतर साथीदार नामे दिनेश भोसले, सागर भोसले,शशिकांत भोसले,वसिम भोसले,राहुल भोसले सर्व रा.विठ्ठलवाडी रोड,कामरगांव शिवार,ता. नगर व पायल काळे रा. भोरवाडी,ता.नगर अशा सर्वांनी मिळुन रांजणगांव मशिद,ता.पारनेर येथील एका घरात जावुन घरातील लोकांना लाकडी दांडके व कत्तीने मारहाण करुन चोरी केल्याचे सांगितले.
स्थागुशा पथकाने लागलीच सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार संदीप पवार यांना सोबत घेवुन ताब्यातील आरोपींचे साथीदारांचा कामरगांव शिवारात शोध घेता ते त्यांचे राहते घरा जवळ विठ्ठलवाडी रोडवर मिळुन आल्याने आरोपी नामे 2) दिनेश वत-याब भोसले 3)सागर पानतास भोसले 4)शशिकांत ऊर्फ सोंड्या सिताराम भोसले वय 5) वसिम वत-याब भोसले वय 6) राहुल रवि भोसले सर्व रा.विठ्ठलवाडी रोड,कामरगांव शिवार,ता. नगर त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.आरोपीचा साथीदार नामे 7) पायल काळे (फरार) रा.भोरवाडी, ता.नगर हा मिळुन आला नाही.ताब्यातील आरोपींकडे टोळीने आणखीन कोठे कोठे व किती गुन्हे केले या बाबत अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता वरील टोळीतील सदस्यांनी मिळुन दोन अडीच महिन्यात पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद,ढवळपुरी,पिंप्रीगवळी या ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले.ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेली वाहने व हत्यारे याबाबत विचारणा करता आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल घरात व घराचे आजु बाजुला लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने आरोपींकडुन 15 ग्रॅम वजनाचे 1,05,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, 5 ग्रॅम वजनाचे 37,500/- रुपये किंमतीचे डोरले, 24,500/- रुपये रोख, 1,00,000/- रुपये किंमतीची पल्सर मोटार सायकल व 1,500/- रुपये किंमतीची 2 लोखंडी कत्ती व 1 लोखंडी तलवार असा एकुण 2,68,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यातील आरोपींना सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 187/24 भादविक 395 या गुन्ह्याचे तपासकामी सुपा पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/सोपान गोरे,समाधान भाटेवाल व अंमलदार भाऊसाहेब काळे,बबन मखरे, रविंद्र कर्डीले,दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे,ज्ञानेश्वर शिंदे,अतुल लोटके,गणेश भिंगारदे,देवेंद्र शेलार,विजय ठोंबरे,संदीप चव्हाण, भिमराज खर्से,संदीप दरंदले, फुरकान शेख,मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुगांसे,रोहित येमुल, आकाश काळे,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,सागर ससाणे,जालिंदर माने,किशोर शिरसाठ,विशाल तनपुरे, उमाकांत गावडे,संभाजी कोतकर व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे यांनी केलेली आहे.