
अहमदनगर (दि.१६ एप्रिल):-यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -*अहमदनगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 44 वर्ष
▶️ *आलोसे- तुकाराम भीमराव खेडकर, वय-35 वर्ष, पद-पोलीस नाईक/2127,वर्ग-3,
नेमणूक- नेवासा पोलीस स्टेशन,ता. नेवासा,जि. अहमदनगर, हल्ली राहणार – राधाकिसन गिरी यांचे घरात भाड्याने ,नेवासा फाटा ,तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर ,मूळ राहणार -कोनोशी ,तालुका शेवगाव ,जिल्हा अहमदनगर
2) नंदू पांडुरंग सरोदे, खाजगी इसम, रा. देवसडे, ता.नेवासा, जि.अहमदनगर, 3) खाजगी इसम पोपट सरोदे, पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही,
▶️ *लाचेची मागणी-*दि.12/04/2024 रोजी 10,000/- रु.
दि.16/04/2024 रोजी 8,000/- रुपये तडजोडी अंती 5,000/- रुपये
▶️ *लाच स्विकारली-*
5,000/ रुपये
दिनांक-16/04/2024 रोजी
▶️ *हस्तगत रक्कम-*
5,000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण-* यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द.वि. कलम 324 वगैरे गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी नंदू सरोदे,खाजगी इसम व आलोसे खेडकर हे तक्रारदार यांच्याकडे 10,000/-रुपये लाच मागणी करत असले बाबतची तक्रार
ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 12/04/2024 रोजी प्राप्त झाली होती.त्यानुसार दिनांक 12/04/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,
पडताळणी दरम्यान खाजगी इसम नंदू सरोदे यांनी तक्रारदार यांच्याकडे आलोसे खेडकर यांच्या करिता 10,000/- रुपये लाचेची मागणी केली तसेच खाजगी इसम पोपट सरोदे यांनी तक्रारदार यांना आलोसे खेडकर यांच्याकडे नंदू सरोदे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याकरिता प्रोत्साहन दिले. त्यानंतर दिनांक 16/04/2024 रोजी आलोसे खेडकर यांच्याविरुद्ध लाच मागणी पडताळणी केली असता त्या दरम्यान आलोसे खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 8,000/- रुपये लाचेची मागणी करून 5,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज दिनांक 16/04/2024 रोजी आलोसे खेडकर यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. त्या दरम्यान आलोसे पोलीस नाईक/ 2127 तुकाराम भीमराव खेडकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 5,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे.
आलोसे पोलीस नाईक /2127 तुकाराम भीमराव खेडकर,
खाजगी इसम नंदू सरोदे व
खाजगी इसम पोपट सरोदे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ पर्यवेक्षण अधिकारी**
श्री.प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर.* मोबा.नं.7972547202
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्रीमती छाया.के .देवरे,पोलिस निरीक्षक,ला.प्र. वि. अहमदनगर
मो.नं.8788215086
▶️ **सहाय्यक सापळा अधिकारी*
1) श्री राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक ला प्र.वि. अहमदनगर मो.नं.9420896263
▶️ *सापळा पथक*
1) पोलीस कॉन्स्टेबल/ 2376 गजानन गायकवाड 2) महिला पोलीस नाईक/2225 राधा खेमनर
3) महिला पोलीस कॉन्स्टेबल/1352 सना सय्यद. 4) चालक पोलीस हवालदार/ दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* -*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
*3) श्री.नरेंद्र पवार , वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलीस अधीक्षक,अहमदनगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*