
संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये महात्मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेने बालवाडीला सुविधा ऊपलब्ध करून दिली.
सदर बालवाडीला साईश्रद्धा अंगणवाडी सेविका संघटनेच्या पारनेर तालुकाध्यक्षा मायाताई मिसळ यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते बालवाडीतील बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर वस्तीमध्ये सेवाभावी संस्थेने सुरु केलेल्या बलावाडीला शासकीय सुविधा मिळून देणे कामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर लगत भटक्या विमुक्त समाजाची वस्ती, अल्पसंख्यांक समुदाय वस्ती,ओबीसी प्रवर्गाची वस्ती,वाकचौरे वस्तीसह मागासवर्गीय समाजाच्या वस्त्या आहेत.सदर वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुले आहेत.गावातील इतर बालवाड्या लांब अंतरावर आहेत,रस्ता आडवाटेचा,ओढ्याचा परिसर,झाडेझुडपे,बिबट्याची दहशत असल्याने अनेक विद्यार्थी बालवाडीत जाऊ शकत नाही.त्यामुळे सर्वांगीण शिक्षण,पोषण आहारापासून वंचित राहतात.त्यामुळे महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेने बालवाडीची सुविधा ऊपलब्ध करून दिली आहे.सदर बालवाडीस शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे कमी संघटने मार्फत सहकार्य करणेचे आश्वासन मायाताई मिसळ यांनी दिले.संस्थेच्या या उपक्रमाचे हिवरगाव पावसा पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
बालवाडीस शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देणे कमी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव,तसेच हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,ग्रामसेवक हरिष कुमार गडाख यांच्या सह ग्रामस्तांचे सहकार्य मिळत असल्याची माहिती संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.यावेळी महात्मा फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेनचे सचिव नितीनचंद्र भालेराव,उपाध्यक्ष रंजना भालेराव,शुभम शिंदे,अभिजित भालेराव,रोहिणी पलघडमल,अर्चना भालेराव,रूपा जगताप,अनुसया खरात,रंजना भालेराव,रेनाज पठाण,यांच्या सह परिसरातील महिला, पालक आणि सहा वर्षाखालील बालके मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.