Maharashtra247

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची:खा.डॉ.सुजय विखे पाटील 

अहिल्यानगर/प्रतिनिधी:-भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार,धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महाविरांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले. यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, भगवान महावीर हे त्याग,करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत.त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे.यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसाद करूण जीवन सुखकर करावे असे त्यांनी सांगितले.

त्याच बरोबर जैन बांधवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह मा.नगरसेक सचिन जाधव,अजिक्य तळे,प्रशांत मुथ्था,कमलेश भंडारी आणि महावीर ग्रुपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

You cannot copy content of this page