वंचित बहुजन आघाडी कडून उत्कर्षा रुपवतेंच्या उमेदवारीने समाजासमोर एक सक्षम पर्याय
संगमनेर प्रतिनिधी (नितीन भालेराव):-वंचित बहुजन आघाडी कडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहे.
शिर्डी मतदार संघातील आजी- माजी खासदार यांच्यावर मतदार नाराज आहे.कारण विकास कामांचा अभाव,बेरोजगारी,एम आय.डी.सी.चा खुंटलेला विकास,मागासवर्गीय वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव,दुष्काळजन्य भागात पाण्याची भीषण टंचाई,सिंचनाच्या सुविधांचा अभाव, महिला सुरक्षेचा प्रश्न,बिघडलेला सामाजिक सलोखा,गुन्हेगारी अशा प्रकारे असंख्य समस्या शिर्डी मतदार संघात भेडसावत आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक वेळा केलेले पक्षांतर तसेच निवडून आल्यानंतर खा.सदाशिव लोखंडे यांचा मतदार संघात संपर्काचा अभाव यामुळे जनता त्रस्त आहे.
अशा परिस्थितीत उत्कर्षा रुपवतेंच्या उमेदवारीने सर्वजन समाजासमोर एक सक्षम पर्याय निर्माण झाला आहे.राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते अभ्यासू,कायद्याची उत्तम ज्ञान,सामजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि उत्कृष्ट जनसंपर्क तळागाळातील घटकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेले नेतृत्त्व आहे.त्यांचा महिला वर्गात चांगला संपर्क आहे.
महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी घेत असलेली आग्रही भूमिका वाखाणण्याजोगी आहे.त्या नेहमी समाजाच्या सुख दु:खात सहभागी असतात.विद्यार्थी, महिला शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,कामगार,व्यावसायिक,उद्योजक,व्यापारी,नोकरदार,मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्यांक,ओबीसी,सर्वच घटकांसाठी सर्वसमावेशक चेहरा उत्कर्षा रुपवते या आहेत.या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्कर्षा रुपवतेंच्या उमेदवारीने सर्वजन समाजासमोर एक सक्षम पर्याय उभा राहिला आहे.