बळीरामपुर गौतमीनगर येथे वंचितचे लोकसभा उमेदवार ॲड.अविनाश भोसिकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक संपन्न;नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड (प्रतिनिधी):-नांदेड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड.अविनाश भोसिकर यांच्या प्रचारार्थ नांदेड दक्षिण तालुक्यातील बळीरामपुर गौतमी नगर ठिकाणी दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी कॉर्नर बैठक संपन्न झाली.
या कॉर्नर बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भोसीकर यांना विजयी करण्या संदर्भात चर्चा होऊन सर्वजणांनी एकजुटीने काम करावे असे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांनी सांगितले.यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,युवा जिल्हाध्यक्ष धीरजभाऊ हाके,जिल्हा महासचिव शाम भाऊ कांबळे,वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष प्रा.विनायक गजभारे सर,तालुका महासचिव धमदिप येंगडे,तालुका उपाध्यक्ष राजश्री ताई गोणारकर,सामाजिक कार्यकर्त्या वंचित बहुजन आघाडी मा.जिल्हाध्यक्षा कौशल्या रणवीर, तालुका सचिव आकाश भाऊ चित्ते,तालुका माजी महासचिव अनिल वाघमारे,वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण तालुका संपर्क प्रमुख अमोल भाऊ शिरसे,वाजेगांव सर्कल प्रमुख आकाश राक्षसमारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.